सोमेश्वर विद्यालयात १४० किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

मुढाळे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच पंचायत समिती, बारामतीचे सभापती मा. श्री. किरण तावरे यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर व आरोग्य उपकेंद्र मुढाळे यांच्या वतीने सोमेश्वर विद्यालय, मुढाळे येथे किशोरवयीन मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.
मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी आयोजित या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यालयातील एकूण १४० किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १० पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या १२ मुली आढळून आल्या. संबंधित मुलींना पुढील आरोग्य तपासणी, योग्य आहार व आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमावेळी सोमेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा कुलकर्णी, श्री. जितेंद्र चव्हाण तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकरचे आरोग्य निरीक्षक श्री. धनंजय लिमजे, आरोग्य सेविका श्रीमती नेहा भोसले, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती पल्लवी गायकवाड आणि आशा स्वयंसेविका श्रीमती मंगल कदम यांनी तपासणी शिबिराचे कामकाज पार पाडले.
किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ओळखून त्यावर वेळेत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. शाळा आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक तपासणीला प्रोत्साहन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!