शुक्रवारी बारामतीत नितीन चंदनशिवे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान


महात्मा फुले नगर, आमराई येथे सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन
बारामती प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बारामती शहरातील महात्मा फुले नगर, आमराई येथे करण्यात आले आहे.
कालकथित झुंबरलाल अहिवळे, कालकथित नानुबाई अहिवळे आणि कालकथित उषाताई अहिवळे यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त मानव एकता युवक संघटना, शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नितीन चंदनशिवे हे आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून सामाजिक वास्तव, सध्याचे ज्वलंत प्रश्न, समाजप्रबोधन तसेच सकारात्मक विचार मांडण्यासाठी परिचित आहेत. त्यांच्या विचारांना आणि प्रबोधनात्मक व्याख्यानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!