‘मानवसेवा हीच खरी समाजसेवा’ — पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणंद : पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त लोणंद शहरातील समस्त मुस्लिम समाज व लोणंदकर नागरिकांच्या वतीने अक्षय ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध समाजातील तब्बल ५० जणांनी रक्तदान केले.‘मानवसेवा हीच खरी समाजसेवा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.

रक्तदानासारख्या विधायक उपक्रमाच्या माध्यमातून पैगंबर जयंतीचा मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.या उपक्रमासाठी अहले सुन्नत वल जमातचे अध्यक्ष तौफिक कुरेशी, बबलू सय्यद, अमर आतार, मोहसीन सय्यद, मुबीन सय्यद, सलीम शेख, मुदस्सर आतार तसेच लोणंद मुस्लिम समाजाचे विश्वस्त व मान्यवर यांनी विशेष परिश्रम घेतले.दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आजम भाई आतार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

रक्तदानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा हा उपक्रम सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.रक्तदानातून मानवतेचा संदेश देत पैगंबर जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!