माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात, १४ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

माळेगाव : अवैध दारू वाहतुकीविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माळेगाव पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून अवैध दारूचा साठा आढळून आला.

पोलिसांनी दारूसह संबंधित वाहन व इतर साहित्य असा एकूण सुमारे १४ लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल ताब्यात घेतला.या प्रकरणी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या दारूचा नेमका प्रकार व किंमत तसेच आरोपींची नावे याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.माळेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!