करंजे : करंजेत वृक्षारोपणासाठी 14 ट्री त्या माध्यमातून शेततळे उभारणीला प्रारंभ ; सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांचा पुढाकार…..

करंजे, ता. बारामती : करंजे गावातील गायरान जागेवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी गावचे विद्यमान सरपंच श्री. भाऊसाहेब हुंबरे यांनी पुढाकार घेत शेततळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या शेततळ्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

गायरान जागेवरील वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असल्याने 14 ट्री त्या माध्यमातून सरपंच हुंबरे यांनी निर्णय घेतला. या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. शेततळ्यामुळे वृक्षारोपण केलेल्या परिसराला नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.शेततळ्याच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी असिस्टंट बीडिओ इंगोले साहेब यांच्या हस्ते शेततळ्याचे उद्घाटन करण्यात आले

यावेळी वरिष्ठ सहाय्यक शिर्के साहेब,14 ट्रीज व्यवस्थापक अनंत तायडे साहेब आणि अकाउंट मॅनेजर प्रवीण बोरकर साहेब व बाजीरांग बोरकर साहेब आणि झाडाच संगोपन करणारी प्रेमी धीरज वायाळ आणि गुणिवंत साळवे मुरूमचे ग्रामसेवक चांदगुडे तसेच माजी उपसरपंच सचिन पवार गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे करंजे गावाच्या हरित विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!