करंजे : रेगुलर कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी…..

करंजे : रेगुलर कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्या; दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी जोर धरू लागलीबारामती तालुक्यातील सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणीबारामती तालुक्यातील सोमेश्वर पंचक्रोशीतील नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.शेतकरी आपल्या शेतीसाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडण्यासाठी अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सावकारांकडून पैसे उधार घेतात. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसतानाही आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असतानाही हे शेतकरी बँकेचे कर्ज नियमितपणे फेडतात. मात्र, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीच्या योजनांमध्ये अनेकदा अपेक्षित लाभ मिळत नाही, ही त्यांची मोठी खंत आहे.यापूर्वी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते. मात्र, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाचे अस्थिर दर आणि वाढत चाललेला कर्जाचा बोजा पाहता ही मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करावा.तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विशेष निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.कर्ज बुडविणाऱ्यांपेक्षा कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन दिले, तर भविष्यातही शेतकरी कर्जफेडीला प्राधान्य देतील.त्यामुळे सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा एकमुखी आवाज आहे—“सरसकट कर्जमाफीसोबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्या; दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या!”रेगुलर कर्जदार शेतकरीही शासनाचा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या कष्टाची आणि प्रामाणिकपणाची दखल शासनाने घ्यावी, हीच सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!