मुढाळे: शनिवार दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय मुढाळे शाखेत सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. पंचायत समिती बारामती व एच.डी.एफ.सी.बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात ५२ सायकलींचे वाटप जिल्हा परिषद सदस्य मा. मंगेशभैय्या जगताप, पंचायत समिती सदस्य मा.सौ. वैशालीताई कोकणे, संस्थेचे सचिव मा. श्री भारतजी खोमणे, पंचायत समिती बारामतीचे माजी सभापती मा. मनोहरभाऊ वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुढाळे ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री जयपाल साळवे, उपसरपंच मा.लक्ष्मण दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रेय लोखंडे सामाजिक कार्यकर्ते श्री.अभिजीत वाबळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी पी.आर.यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी शाळेसाठी वॉल कंपाऊंड व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहाची मागणी अध्यक्षांकडे करण्यात आली. अध्यक्षांनी मागणी पूर्ण करण्याची आश्वासन दिले. मुलांसाठी मा. मंगेशभैय्या जगताप मित्र परिवाराच्या वतीने श्री.अभिजीत वाबळे यांनी मुलांसाठी खाऊ वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.धनंजय गायकवाड सर यांनी केले तर आभार श्री. जितेंद्र चव्हाण सर यांनी मानले.
