बारामतीत सामाजिक सलोख्याचा संदेश; बौद्ध बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी

बारामती/प्रतिनिधी येथील मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांसाठी आमराई परिसरातील महात्मा फुले नगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध सामाजिक संघटन व पक्षातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.सध्या देशात आणि राज्यात सामाजिक ऐक्याला बाधा येईल असे वातावरण काही शक्तींकडून जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे.आशा देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी व सर्व जातीधर्मातील सामाजिक एकोपा आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून आपण या इफ्तार पार्टीचे आयोजन करत असल्याचे आयोजक ॲड.सुशील अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले.याप्रसंगी,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर,माजी नगरसेवक आसिफ अली खान, ॲड. अब्दुलकरीम बागवान,नगरसेवक अल्ताफ सय्यद,मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे दीपक भराटे,विकास खोत,प्रकाश टेमघर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत घाडगे,कार्याध्यक्ष गौतम शिंदे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मोहसीन पठाण,सामाजिक कार्यकर्ते दाऊद शेख,इम्रान पठाण,अल्ताफ बागवान, शब्बीर शेख,बिलाल बागवान,ओवेज बागवान,अस्लम शेख,सलिम सय्यद,विष्णुपंत चव्हाण,विठ्ठल आगवणे, सिकंदर शेख, युनुस शेख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिलाल बागवान,सिद्धार्थ लोंढे,अशपाक सय्यद,रफिक शेख,संजय शिंदे,रितेश गायकवाड, सोमनाथ कदम,सुमित मोहिते यांनी परिश्रम घेतले.विश्वास लोंढे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!