महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल महोदय यांच्या हस्ते योगेश नालंदे यांना प्रदान…

प्रतिनिधी – 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विभागातून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.
बारामती मधील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 2024 सालचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार राज्यपाल श्री जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दत्तात्रय भरणे कृषिमंत्री, आशिष जयस्वाल कृषी राज्यमंत्री, भरत शेठ गोगावले व इतर मान्यवर उपस्थित होते.
अवघ्या एक वर्षात तब्बल 365 शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिली. या यशोगाथांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि सकारात्मक शेती संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी कृषी प्रसाराचे मोठे कार्य केले. कृषी वाहिनीवर काम करताना बाजारभाव, हवामान अंदाज आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे नाट्यरूपंतर ऑडिओ बनवून रेडिओ वरून प्रसारित केले. यासह कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहचली जाते. यासाठी शेतकरी योद्धा या वृत्तपत्राची सुरवात नालंदे यांनी केली आहे. हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.
कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली यासह भविष्यात देखील महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी काम करत आहे आणि करत राहिल असा शब्द उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!