
बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला फोन आणि व्हॉट्सॲप संदेशांद्वारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे.पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणाने १५ एप्रिल २०२६ पासून २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुलीचा वारंवार पाठलाग केल्याचा आरोप आहे. घरासमोरून वाहन घेऊन जाताना हॉर्न वाजवणे, वारंवार मागे-पुढे फिरणे तसेच मोबाईलवरून संपर्क साधून त्रास देणे, असे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित तरुणाने मोबाईलवरून फोन आणि व्हॉट्सॲप संदेश पाठवून भेटण्याबाबत विचारणा केली. याशिवाय मुलीच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे त्रास होत असल्याने अखेर मुलीने पोलिसांकडे धाव घेतली.भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हाया प्रकरणी पोलिसांनी आदेश सोमनाथ पारसे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७८ आणि ३५१(२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ मधील कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.३० ऑक्टोबर २०२६ प्रथम खबर अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.
या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिसांकडून केला जात आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होईल.
